breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणसातारा

‘अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र’; रामराजे निंबाळकर यांचं विधान

मुंबई : अजित पवार भाजप-शिंदे गटाला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांना राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्ययाचं रामराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

रामराजे निंबाळकर म्हणाले, भविष्यातील राजकारण विकासाचे ठेवण्यासाठी आम्ही हा कटू निर्णय घेतला आहे. २१ व्या शतकात सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला देशातील प्रमुख राज्य करण्याचा ध्यास अजित पवार यांनी ठेवला आहे.

हेही वाचा – पुणे जिल्ह्यातील ‘या’ सात तालुक्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

खासदार शरद पवार यांनीही विकासाचे राजकारण शिकवले. १९९९ ला आम्ही सर्वांनी त्यांना पंतप्रधान करण्याची स्वप्ने बघितली होती. त्याप्रमाणे अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं रामराजे निंबाळकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button