‘रणजीत नाईक निंबाळकर यांना पाडणारच’; रामराजे नाईक निंबाळकर यांचे आव्हान

पुणे : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आव्हान दिलं आहे. तुम्ही फक्त उभे राहाच, तुम्हाला पाडून दाखवतो, असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. ते फलटण येथेली बुथ कमिटीच्या मेळाव्यात बोलत होते.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, रणजीत नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही पक्षातून निवडणुकीत आमच्यासमोर यावे मी पाडणारच. तुम्ही फक्त उभे रहा तुम्हाला पाडून दाखवतो वेळ पडल्यास मी स्वत: उभा राहीन किंवा बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर उभे राहतील.
हेही वाचा – आला पावसाळा आता आरोग्य सांभाळा! अशी घ्या आरोग्याची काळजी
दरम्यान, भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना आव्हान दिले होते. हिंम्मत असेल तर माझ्याविरोधात लोकसभाला किंवा जयकुमार गोरेंच्या विरोधात विधान सभेला उभे राहुन दाखवा. बघू किस मे कितना है दम, असं रणजितसंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं होतं.





