‘प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करावे’; रामदास आठवले
![Ramdas Athawale said that Prakash Ambedkar should work under the leadership of Prime Minister Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ramdas-Athawale-and-Prakash-Ambedkar-780x470.jpg)
मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत न जाता पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजासाठी काम करावे असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. तसेच महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांचा अपमान करत आहे, असंही ते म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे दलित समाजातील मोठे नेते आहेत. त्यांना सर्वत्र सन्मान आहे. त्यांनी महाविकास आघाडीत न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये यावे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजासाठी काम करावे असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप सेमीफायनल; कधी आणि कुठे पाहता येणार?
मी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाचे काम करत आहे. त्यांनी मला मंत्रिमंडळात संधी दिली आहे. अनेक लोक संविधान अडचणीत असल्याचे सांगत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच संविधान बळकट करत आहेत. त्यामुळे असे बोलणाऱ्या लोकांच्या मताला काही महत्त्व द्यायचे काम नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
पोलीस ठाण्यात गोळीबार झालेल प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात संबंधित आमदारांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात कायदा कायद्याचे काम करेल, असंही रामदास आठवले म्हणाले.