‘भारताच्या नादी लागाल तर तुमची मुलं अनाथ होतील’; केंद्रीय मंत्र्याचा पाकिस्तानला इशारा
![Rajeev Chandrasekhar said that if India's nadi starts, your children will become orphans](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Rajeev-Chandrasekhar-780x470.jpg)
नवी दिल्ली : काश्मीरमधील अनंतनागमध्ये गेल्या काही दिवसांपासून चकमक सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अद्याप दोन दहशतवादी गुहेत लपल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यावरून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारताच्या नादी लागाल तर तुमची मुलं अनाथ होतील, असं राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एक्सवर एक पोस्ट लिहली आहे. यामध्ये म्हटलं की, भारताला अनेक शत्रू आहेत. या शत्रूंना भारताचा विकास रोखायचा आहे. पण त्यांना हे माहीत असलं पाहिजे की, भारतीय लष्कर हे एक ‘घातक मशीन’ आहे. त्यामुळे त्यांनी अशी कोणतीही चूक करू नये. हे तुम्ही टाळलं पाहिजे.
हेही वाचा – छगन भुजबळांचं तेलगी घोटाळ्याप्रकरणी मोठं विधान; म्हणाले…
India has enemies – These enemies want to stop Indias rise. But they should know this.
Indian Military is now a modernized high tech and lethal machine – make no mistake about it. You will be wise to avoid it.
This is NewIndia – India will not be intimidated , India will not… https://t.co/dapF7JV3qC
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@Rajeev_GoI) September 17, 2023
हा नवा भारत आहे. हा भारत शत्रूंसमोर कधीच गुडघे टेकू शकत नाही. भारताने यापूर्वी अनेक युद्धे पाहिली आहेत. आम्हाला युद्ध नको आहे. पण तुम्ही भारताबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर, तुमची मुलं दुसऱ्यांना सांभाळावी लागतील, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत राजीव चंद्रशेखर यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.