राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव?
![Raj Thackeray Uddhav Thackeray will come together](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/raj-thackeray-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात भेट झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे.
राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासी समजले जाणारे अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊतांना युतीचा प्रस्ताव दिला असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा – Shirdi Sai Baba : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात सात कोटींचे दान!
अभिजीत पानसे म्हणाले की, मनसे पक्षात मी इतक्या मोठ्या स्थानावर नाही. मी राज ठाकरेंचा कट्टर सैनिक आहे. त्यामुळे तशी वेळ येणार असेल तर मला माहिती नाही. युतीवर चर्चा करायची असेल, तर स्वत: राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यावर बोलतील. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी संजय राऊतांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात आलो होतो. त्याचा वेगळा अर्थ लावू नका. या भेटीत राजकीय चर्चांना काहीही संबंध नाही. माझे संजय राऊतांशी फार जुने संबंध आहेत. मला संजय राऊतांनीच राजकारणात आणलं होतं. त्यामुळे मला त्यांना काही कामानिमित्त भेटायचं होतं.