Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘शरद पवारांचं अख्य आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं’; राज ठाकरेंची टीका

Raj Thackeray | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक मतदारसंघात सभा घेत आहेत. राज ठाकरेंनी वरळीतील सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवारांचं अख्य आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं, अशी टीका राज ठाकरे यांनी त्यांच्यावर केली.

राज ठाकरे म्हणाले, की मी अनेकदा भूमिका बदलतो, अशी टीका माझ्यावर केली जाते. मात्र, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यात काहीही गैर नाही. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही. पण स्वत:च्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं याला भूमिका बदलणं म्हणतात. शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांनी बदललेल्या भूमिका बघून भूमिकाही लाजेल. त्यांचे अख्य आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं आहे.

हेही वाचा      –      ‘बटेंगे तो कटेंगे’बाबत नितीन गडकरींकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, ‘मी स्वयंसेवक संघाच्या..’ 

शरद पवार हे काँग्रेसच्या जीवावर आमदार झाले. पुढे मंत्रीही झाले. त्याच काँग्रेसचे आमदार फोडून ते जनसंघ आणि इतर पक्षांना घेऊन त्यांनी पुलोद स्थापन केली. इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर पुलोद बरखास्त करून केली. त्यानंतर सहा वर्ष बाहेर राहिले. 1986 साली त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1988 साली मुख्यमंत्री बनले. 1991 ला संरक्षण मंत्री झाले. पुढे 1999 मध्ये सोनिया गांधींना विदेशी बाई म्हणत काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर स्वतंत्र निवडणूक लढवली आणि पुन्हा काँग्रेसबरोबर सत्ते जाऊन बसले. याला भूमिका बदलणं म्हणतात, असंही राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button