पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! राहुल कलाटे शिंदेच्या सेनेत
![Rahul Kalate joins Eknath Shinde's Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/uddhav-thackeray-and-Rahul-Kalate-780x470.jpg)
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. कलाटे यांच्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का बसला आहे.
राहुल कलाटे यांच्यासोबत नवनाथ जगताप, संपतआप्पा पवार, अश्वीनी विक्रम वाघमारे यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच पिंपरी-चिंचवड मध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
हेही वाचा – मुंबईच्या मार्वे बीचवर पाच मुले बुडाली, दोघांना वाचविण्यात यश
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार – राहुल कलाटे
आज मी माझ्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. संपुर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्यांना कलेक्ट होणारा नेता अशी प्रतिमा एकनाथ शिंदे यांची होत आहे. त्यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय आज आम्ही सर्वांनी घेतला आहे. तो निर्णय घेत असताना फुडची कशी दिशा काय ठरवायची याच्यावर देखील चर्चा झाली हे तुम्हाला भविष्यात कळेल, असं राहुल कलाटे म्हणाले.