Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘गौतम अदाणींना अटक करा’; राहुल गांधींची मागणी

Rahul Gandhi | संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसने समूहाशी संबंधित भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे प्रकरण उचलले. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम अदाणी यांना अटक करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. यावेळी काही खासदारांनी स्थगन प्रस्तावाचा मुद्दाही रेटला. तर समाजवादी पक्षाने संभल येथे झालेल्या जातीय हिंसाचाराचा मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी लोकसभेत बोलताना संविधानावर दोन दिवस चर्चा करण्याची मागणी केली. हीच मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेतही केली.

हेही वाचा     –      राज्यभरात थंडीचा कडाका आणखी वाढणार, हवामान खात्याचा इशारा

राहुल गांधी यांनी संसदेबाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना गौतम अदाणी यांच्यावर टीका केली. साहजिकच अदाणी काय आरोप स्वीकारणार आहेत का? ते आरोप फेटाळणारच. प्रश्न हा आहे की? त्यांना अटक झाली पाहीजे आणि या प्रकरणाशी निगडित इतरांनाही ताब्यात घेतले पाहीजे. अमेरिकेच्या न्यायालयात त्यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी आरोप ठेवण्यात आलेले आहेत. खरंतर ते तुरुंगात असायला हवेत, पण सरकार त्यांना वाचवत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button