‘नव्या संसद भवनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते नाहीतर…’; राहुल गांधींचं विधान चर्चेत
![Rahul Gandhi said that the new Parliament building should be inaugurated by the President](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/narendra-modi-and-Rahul-Gandhi--780x470.jpg)
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सावरकर जयंतीनिमित्त २८ मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. संसद भवनाच्या नवीन इमातीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरूवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना या इमारतीचे उद्घाटन करण्याची विनंती केली. दरम्यान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोध केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत हा विरोध केला आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे, पंतप्रधानांच्या हस्ते नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – तुमची पिळवणूक करणाऱ्यांना का निवडून देता? राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सवाल
८६२ कोटी रूपये खर्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० रोजी नवीन संसद भवनाच्या कामाचा शुभारंभ केला होता. ८६२ कोटी रूपये खर्च करून चार मजल्यांची इमारत उभी राहिली आहे. यामध्ये लोकसभेच्या ८८८ आणि राज्यसभेच्या ३७४ सदस्यांसाठई सदस्यांना बसण्याची व्यवस्था होणार आहे. फक्त २८ महिन्यांमध्ये ही इमारत बनून सज्ज झालीय.