breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे कार अपघात प्रकरण : आरोपीने ९० मिनिटांत उडवले ४८ हजार रूपये, पोलिसांची माहिती

पुणे | विद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर पोर्श कारच्या अपघाताने हादरलं आहे. पोर्श कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या कारने धडक देणारा मुलगा अल्पवयीन बेदरकारपणे कार चालवत होता. त्याने दिलेल्या कारच्या धडकेमुळे अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघेजण ठार झाले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यासह राज्यभर उमटताना दिसत आहे. तसेच या प्रकरणात नवनवी माहिती रोज समोर येत आहे. आरोपीने पबमध्ये किती पैसे उडवले, त्याची माहिती आता समोर आली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी शनिवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी कोझी पबमध्ये प्रवेश केला होता. तिथे त्यांनी ९० मिनिटांत ४८ हजार रुपयांचे बिल केले. तिथून ते १२ वाजून १० मिनिटांनी ब्लॅक मॅरियट या दुसऱ्या पबमध्ये गेले, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. अमितेश कुमार यांनी वर्तमानपत्राला सांगितले की, आम्ही कोझी पबमधून ४८ हजारांचे बिल घेतले आहे. अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी कोणते मद्य घेतले त्यासाठी किती खर्च केले, याची माहिती आहे.

हेही वाचा    –      ‘जरांगेंच्या आंदोलनाचा मला परभणीत फटका बसला’; महादेव जानकर यांचं विधान 

दरम्यान, पुणे पोलिसांनी अल्पवयीन चालकाचे वडील आणि नामांकित बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे. तसेच दोन्ही पबमधील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पबचालकांनी अल्पवयीन व्यक्तीला मद्य पुरविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button