Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शरद पवार यांना भाजपकडून दोन मोठ्या पदांच्या ऑफर्स’; पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाली. या भेटीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते.

हेही वाचा – हर घर तिरंगा अभियान: भाजपातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रभक्तीचा जागर!

जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. अजितदादा हे नुकतेच दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांनी अजितदादांना शरद पवार यांना हा प्रस्ताव सांगण्यास सांगितलं असल्याचं समजतं. भाजपने आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडली. भाजपला आता शरद पवार यांनाही आपल्यासोबत घ्यायचं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळावं म्हणून भाजपची ही खेळी असल्याचं सांगितलं जात आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

शरद पवार आणि अजितदादा यांच्यातील भेटीवरून शिवसेनेत नाराजी आहे. काँग्रेसलाही या भेटी मंजूर आहेत काय? असा सवाल चव्हाण यांना करण्यात आला. त्यावर, या बैठकींची किती गरज आहे, याचा निर्णय शरद पवार यांनीच घ्यायचा आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button