Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या‘; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. विशेषतः पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते तसेच मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गांच्या दुरुस्तीला तातडीने प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

मंत्रालयात पार पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, रस्ते विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, उपसचिव प्रज्ञा वाळके, उपसचिव निरंजन तेलंग यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात नवीन रस्त्यांची कामे करताना वाहतूक रहदारीचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. विशेषतः डोंगराळ भागातील तसेच जास्त पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रांतील रस्त्यांच्या बांधणीत दर्जेदार व टिकाऊ कामे होण्यासाठी ठराविक मापदंड निश्चित करून रस्त्यांचे आयुष्यमान वाढेल अशी कामे करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरांना व जिल्ह्यांना जोडणारे रस्ते या पद्धतीने विकसित करावेत, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.

पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाढत्या वर्दळीचा विचार करता शहरालगतची सर्व रेल्वे स्थानके, विमानतळ, द्रुतगती मार्ग यांना जोडणारे मुख्य रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत. यासाठी अधिकारी स्तरावर समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

हेही वाचा –  ‘तंत्रज्ञानाद्वारे वापर करून शेतमाल विक्रीची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना जलद उपलब्ध करून द्यावी’; पणन मंत्री जयकुमार रावल

याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील प्रमुख महामार्ग व रस्त्यांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे व प्रसाधनगृह केंद्रांची उभारणी करण्यासह पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हायब्रीड अ‍ॅन्युटी (एचएएम) टप्पा-३ अंतर्गत १०,००० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून ही कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले.

तसेच नाशिक परिक्रमा मार्ग, पुणे–शिरूर उन्नत मार्ग, हडपसर–यवत मार्ग, तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग आदी महामार्गांच्या कामांचा आढावा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला.

राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत प्रस्तावित रोपवे प्रकल्पांच्या कामकाजाचाही आढावा यावेळी घेण्यात आला व या कामांना चालना देण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच भीमाशंकर ते कर्जत या नवीन रस्त्याच्या आखणीबद्दल व या रस्त्याच्या बांधकाम नियोजचासुद्धा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button