breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर

Lok Sabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी सुरू होऊन एक तास होत आला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीनेही मोठी झेप घेतली आहे. सध्या एनडीए २५३ जागांवर आघाडी आहे, तर इंडिया आघाडी १६४ जागांवर आघाडीवर आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. तर येथून काँग्रेसचे अजय राय ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीचा निकाला थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा    –      शिरूर लोकसभा: पहिल्या फेरीत अमोल कोल्हे ६११६ मतांनी आघाडीवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून ७३११ मतांनी आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button