संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
![Prime Minister Narendra Modi said that today we are bidding farewell to this historic Parliament building](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Narendra-Modi-3-780x470.jpg)
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. तर उद्यापासून नव्या संसद भवनात कामकाज सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण करत आज आपल्या देशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी आपण ७५ वर्षांचा देशाचा प्रेरक प्रवास आठवत आहोत. आज पुढे जाण्याचा आपला क्षण आहे. आज आपण या ऐतिहासिक संसद भवनाचा निरोप घेत आहोत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हे सदन इंपिरियल लेजिस्ट्रेटिव्ह कौन्सिल होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसद भवन अशी ओळख या इमारतीला मिळाली. इमारत जरी ब्रिटिशांनी बांधली असली तरीही या इमारतीच्या उभारणीसाठी आपल्या देशवासीयांनी घाम गाळला आहे. निधीही खर्च केला आहे.
मागच्या ७५ वर्षांच्या कालावधीत अनेक लोकशाही प्रक्रिया आपण या सदनात पाहिल्या. ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. आपण आता नव्या संसदेत कामकाज सुरु करणार आहोत. मात्र हे संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना इतिहास सांगत राहणार आहे. भारताच्या इतिहासाचा सुवर्ण अध्याय काय होता त्याची ओळख जगाला केली जाणार आहे. अमृतकाळात आपण आता नवी स्वप्नं, नवी उर्जा, नव्या संकल्पना घेऊन पुढे जात आहोत. आज जगात भारताची चर्चा होते आणि आपल्याला त्याचा गौरव आहे. आपल्या ७५ वर्षीय संसदीय इतिहासाचा हा सामूहिक परिणाम आहे. त्यामुळेच भारताचा डंका जगात वाजतो आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा – ‘आजकाल #&$@ सुद्धा आमदार होतात’; बच्चू कडू यांचं वादग्रस्त वक्तव्य नंतर माफीनामा
#WATCH | Special Session of Parliament | In Lok Sabha, PM Modi says, "…All of us are saying goodbye to this historic building. Before independence, this House was the place for the Imperial Legislative Council. After independence, this gained the identity of Parliament House.… pic.twitter.com/GRWUlr69U2
— ANI (@ANI) September 18, 2023
जी २० ला आपल्या देशात यश मिळालं. त्यामुळे देशाचा गौरव वाढला. १४० कोटी भारतीयांचं हे यश आहे, हे माझं किंवा पक्षाचं यश नाही. भारतात ६० ठिकाणी जी २० परिषद पार पडली, देशातल्या राज्यातील विविध सरकारांनी ही परिषद घेतली ही बाब गौरवास्पाद आहे. भारताकडे जेव्हा या परिषदेचं अध्यक्षपद असताना अफ्रिकन युनियन सदस्य झाला. मी तो भावनिक क्षण कधीही विसरु शकत नाही. किती मोठ्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आपल्या भाग्यात लिहिला गेला आहे ही बाबही अभिमानास्पद आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.