पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपा नेत्याचं मोठं विधान
![Pravin Darekar said that it would be a pleasure if Pankaja Munde is fielded in the Lok Sabha elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Pankaja-Munde-1-780x470.jpg)
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना खाली बसवून मी राजकारणात पुढे जाणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या विधानामुळे पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होत आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, लोकसभेसाठी आता आमचं मिशन ४५ नाही. तर मिशन ४८ आहे. आम्ही पॅड बांधून तयार आहे. बॉल आला की बॅटिंग करणार आहोत. केव्हाही निवडणुकीस लागली तरी आम्ही सज्ज आहोत. भाजप सर्वे करुन लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट देत असतं. जे नेते लोकप्रिय आहेत. निवडून येण्याची क्षमता आहे. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळते. या सगळ्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतात.
हेही वाचा – Google Mapचं नवीन फीचर्स लाँच! पेट्रोल, डिझेलची होणार बचत
पंकजाताई आमच्या मोठ्या नेत्या आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर आनंदचं होईल. पण त्याच्या बाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं प्रवीण दरेकर म्हणाले. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात युतीमधून कोण निवडणूक लढणार? यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे तिन्ही नेते बसून बारामतीबाबत निर्णय घेणार आहेत, असं प्रवीण दरेकर म्हणाले.