अशोक चव्हाण भाजपात जाणार? भाजप खासदाराचा मोठा दावा
![Prataprao Chikhlikar said that Ashok Chavan can come to BJP for power](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Ashok-Chavan-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष फुटणार असल्याची चर्चा आहे. याबाबत सातत्याने दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा मोठा दावा भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केला आहे.
प्रतापराव चिखलीकर म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १०० वॉरियर्सच्या बैठकीच्या निमित्ताने नांदेडमध्ये आले होते आणि त्यावेळी ते बोलतांना म्हणाले होते की, भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकण्यासाठी अनेक लोक लाईनीत उभे राहिले आहेत. त्यामध्ये त्यांनी नांदेडच्या काॅंग्रेसच्या काही नेत्यांचा उल्लेख केला. १५० कोटीची थकबाकी अशोक चव्हाणांच्या साखरकारखान्याला सरकार देत आहेत. तर मग आपण लक्षात घेतलं पाहिजे तसेच अशोक चव्हाण यांच्यासाठी ते नवीन नाहीत. ते सत्तेसाठी येऊ शकतात. त्यांचं पक्षात स्वागत आहे.
हेही वाचा – कोणत्या समलिंगी पुरूषांना मासिक पाळी येते? स्मृती इराणींचं नवं विधान चर्चेत
दरम्यान, यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुचक विधान केलं आहे. आम्ही कुणाकडे जात नाही, पक्ष फोडायला जात नाही. पण कुणी भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.