Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मुंबईतीली प्रवास, वीज अदानींमुळे महाग’; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar | अदानी कंपनीला मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा करण्याचे कंत्राट दिल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘बेस्ट’ उपक्रम तोट्यात गेला असून परिणामी सामान्य मुंबईकरांचा प्रवास महाग आणि वीज दर अधिक झाले आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते मुंबईतील प्रचारसभेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, की मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, बेस्ट प्रवास व वीज स्वस्त करण्यासाठी तसेच मुंबईकरांना दिवसा पाणी मिळण्यासाठी वंचित आघाडीच्या उमेदवारांना मते द्या. महायुती सरकार सत्तेत पुन्हा आले तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाला उत्पन्नाची अट लावली जाईल. त्यामुळे एका पिढीनंतर आरक्षण संपणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती सरकार घाईने घेवून इतर मागास वर्गीयांना मिळणारे २७ टक्के आरक्षण मोडीत काढेल.

हेही वाचा    –        ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, कारण..’; देवेंद्र फडणवीस यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य 

शहाबानो प्रकरणी मुस्लिम समाजाने ज्याप्रमाणे सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडले होते, त्याप्रमाणे वंचित समुहांनी एकी केली तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाला लावण्यात येणाऱ्या उत्पन्नाच्या अटीसंदर्भात भाग पाडू शकतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button