Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शहरात १५ हरित मतदार केंद्र स्थापित करणार’;  अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

पिंपरी : महापलिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर इतिहासात पहिल्यांदाच  महापालिकेच्या वतीने मतदारांना पिण्यासाठी सुमारे ५ लाख पाणी बॉटल्स उपलब्ध करून देण्यात येणार असून सुमारे ३०० सुरक्षारक्षक कर्मचारी, २५० महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, १५ हरित मतदान केंद्र, आपत्कालीन विद्युत व्यवस्था, मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था आदी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली असून यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामकाज करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शहरातील पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश पुणे जिल्ह्याचे  निवडणूक निरीक्षक यांनी महापालिकेला दिल्या आहेत.  त्याअनुषंगाने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक शाखेचे उपआयुक्त बापू बांगर, मुख्य अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, देवन्ना गट्टूवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, उमेश ढाकणे, निलेश भदाणे,  सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, मुकेश कोळप, विजयकुमार थोरात, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह कार्यकारी अभियंता, संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा    –        ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, कारण..’; देवेंद्र फडणवीस यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य 

शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीमध्ये ८ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या सुमारे २७ ठीकाणी मतदारांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नोडल अधिकाऱ्यांनी संबधित मतदान केंद्रांवर उपस्थित सर्व यंत्रणांशी समन्वय ठेऊन सोपविण्यात आलेले कामकाज करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी बैठकीत दिले. यामध्ये ८ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ११ ठिकाणे आहेत, पिंपरी विधानसभा मतदारसंघात  एकूण ४ ठिकाणे तर भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण १२ ठिकाणे असून महापलिकेच्या वतीने शहरातील सर्व मतदान केंद्रांवर विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी सांगितले.

मतदान केंद्राच्या ठिकाणी किमान सुविधा उपलब्ध करून देताना कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून कामकाज पार पाडावे.

– प्रदीप जांभळे पाटील,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button