Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

..तर जरांगे पाटील पवारांच्या इशाऱ्यावर आंदोलन करतायत हे स्पष्ट होईल; प्रकाश आंबेडकर यांचं विधान

Prakash Ambedkar | मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरले असून, मनोज जरांगे यांनी जर निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहेत हे स्पष्ट होते, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार हे केवळ मराठा नेते झाले आहेत, अशी स्थिती मराठा आंदोलनामुळे निर्माण झाली आहे. आजपर्यंत ते मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांची मागणी टाळत आले. मात्र, रत्नागिरीच्या सभेत त्यांनी जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील.

हेही वाचा    –     दिवट्या आमदार, शरम वाटली पाहिजे; शरद पवारांकडून आमदार टिंगरेंचा समाचार

राज्यात २२ ठिकाणी दंगली घडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जनता सुज्ञ झाली असून, आता वास्तववादी विचार करत आहे. त्यामुळे या प्रयत्नाला यश मिळाले नाही. बेरोजगारी, शेतमालाला हमीभाव आणि गावगाड्याच्या विकासाचे महत्त्वाचे मुद्दे पुढे येत असून, ही सकारात्मक बाब आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला ८८ जागा, तर उर्वरित दोनशे जागा काँग्रेस व शिवसेना यांच्या वाट्याला येतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तिसऱ्या आघाडीबरोबर आपण जाणार नाही असे सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले, की लोकसभेवेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना विनाअट पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून मदतीची आम्हाला अपेक्षा नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button