राजकारण: अजित पवार यांच्या घराचे वासे फिरले : भावापाठोपाठ वहिनींचाही अजित पवारांना विरोध!
शर्मिला पवार म्हणतात... आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं!
![Politics: Ajit Pawar's house turned around: After brothers, sisters-in-law also opposed Ajit Pawar!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/ajit-pawar-sharmila-pawar-QegYk6.jpeg)
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपसोबत जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय पवार कुटुंबियांना मान्य झालेला नाही. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण भाजपसह जाण्याचा निर्णय मान्य नाही असे सांगत अजित पवार यांचा सख्खा भाऊ श्रीनिवास पवार यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर आता अजित पवार यांची वहिनी शर्मिला पवार यांनीही आपल्याला शरद पवार यांना विजयी करायचे आहे, असे आवाहन बारामतीकरांना केले आहे. त्यामुळे अजित पवार यांना कुटुंबातूनच विरोध वाढल्याचे दिसत आहे. शर्मिला पवार या श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत.
‘आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं’ आहे, असे म्हणत शर्मिला पवार यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी संवाद साधला. यावेळी शर्मिला पवार म्हणाल्या की, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे. तुम्ही सर्वजण कुटुंबाचे भाग आहात. कुणाला विरोध करायचा नाही. कुटुंब म्हटले की भांड्याला भांड लागतं. पण आपल्या कुटुंबात असे कधी घडले नाही, असे त्या म्हणाल्या.
आपली ओळख शरद पवारांमुळे आहे. त्यांचे विरोधक देखील साहेबांचं नाव घेतात. वडीलधारी लोकांचा मान ठेवला पाहिजे. साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणे म्हणजे आई आणि वडिलांनी माझ्यासाठी काय केले, असे विचारल्यासारखे आहे. साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का? आपण त्याला गालबोट लावायचं का? असा सवाल शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे, असेही शर्मिला पवार म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपसोबत जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय पवार कुटुंबियांना मान्य झालेला नाही. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण भाजपसह जाण्याचा निर्णय मान्य नाही असे सांगत अजित पवार यांचा सख्खा भाऊ श्रीनिवास पवार यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर आता अजित पवार यांची वहिनी शर्मिला पवार यांनीही आपल्याला शरद पवार यांना विजयी करायचे आहे,
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपसोबत जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय पवार कुटुंबियांना मान्य झालेला नाही. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण भाजपसह जाण्याचा निर्णय मान्य नाही असे सांगत अजित पवार यांचा सख्खा भाऊ श्रीनिवास पवार यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर आता अजित पवार यांची वहिनी शर्मिला पवार यांनीही आपल्याला शरद पवार यांना विजयी करायचे आहे, असे आवाहन बारामतीकरांना केले आहे. त्यामुळे अजित पवार यांना कुटुंबातूनच विरोध वाढल्याचे दिसत आहे. शर्मिला पवार या श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत.
आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं…
‘आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं’ आहे, असे म्हणत शर्मिला पवार यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी संवाद साधला. यावेळी शर्मिला पवार म्हणाल्या की, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे. तुम्ही सर्वजण कुटुंबाचे भाग आहात. कुणाला विरोध करायचा नाही. कुटुंब म्हटले की भांड्याला भांड लागतं. पण आपल्या कुटुंबात असे कधी घडले नाही, असे त्या म्हणाल्या.
आपली ओळख शरद पवारांमुळेच…