पिंपरी-चिंचवड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ‘इन्कमिंग’ सुरूच
सांगवीतील शेकडो कार्यकर्त्यांचा खा. श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाने प्रवेश
![Pimpri-Chinchwad: Chief Minister Eknath Shinde's 'incoming' continues in Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Shivsena-incoming-780x470.jpg)
पिंपरी : खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाचा धडाका सुरूच आहे. सांगवी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. प्रशांत कडलग यांच्या कार्यालयात शिवसेना पक्ष आढावा बैठक उत्साहात पार पडली. या वेळी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या बैठकीवेळी पक्षाची जबाबदारीची पदे देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शिवदूत, बूथ प्रमुख नेमण्यात येणार आहे.
या वेळी प्रशांत कडलग, रवींद्र ब्रम्हे, ऍड. प्रवीण गायकवाड, पोर्णिमा आमराव, शिल्पा देशमाने, प्रवीण खडसे, राजेश बोचरे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये अविष्कार मोरे, वेदांत नांदगावकर, हर्षल आवरी, सुजल पाटील, दर्शन भगत, आदर्श मोलावडे, प्रणव रोकडे, रजत दळवी, झैद शेख, क्रिश पाटील, तन्मय निकाळजे आदीसह ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.