पंकजा मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्या राजीमान्यावर भाष्य
महंत नामदेव शास्त्री यांनी सध्या सुरू असलेल्या परिस्थितीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे मिळाले पाहायला
![Pankaja Munde, Dhananjay Munde, Commentary, Mahant Namdev Shastri, situation, teaching, maintenance,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pankaj-munde-780x470.jpg)
पुणे : नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी भगवान गडाचे दरवाजे कायमचे बंद केले होते, असं प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चारही बाजूंनी आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच नुकतीच DPDC ची बैठक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे हे लागलीच भगवानगडावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी सध्या सुरू असलेल्या परिस्थितीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा – 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25 खो-खोत महाराष्ट्रचा दुहेरी धमाका!
दरम्यान, यावर माध्यमांनी पंकजा मुंडे यांना सवाल केला असता त्यांनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली. नामदेव शास्त्री यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची मला गरज वाटत नाही, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय. तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या दबावावर सवाल केला असताना पंकजा मुंडे यांनी प्रतिसवाल केल्याचे पाहायला मिळाले. ‘दबाव कुठे आहे? स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड प्रकरणात संबंध आढळला तर योग्य ती कारवाई करू, संबंध नसेल तर त्या व्यक्तीवर कोणताही अन्याय नको, ही त्यांची भूमिका आहे.’, असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीमान्यावर भाष्य केले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा