आकुर्डीत गुरव समाजाचे राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन
![Organization of state level bride-groom gathering of Gurav Samaj in Akurdi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/maharashtra-marriage-780x470.jpg)
पिंपरी : अखिल गुरव समाज संघटनेतर्फे दरवर्षी प्रमाणे राज्यस्तरीय वधु-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचसोबत देवस्थान हक्क परिषद, नागरी सत्कार समारंभ, राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक व तिळगुळ हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
मेळाव्याचे उदघाटन प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, सुनिल शेळके, भीमराव तापकीर, निलेश लंके, माधुरी मिसाळ व विधान परिषद आमदार उमाताई खापरे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
२२ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता आकुर्डी येथील श्री. खंडोबा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. अखिल गुरव संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष अँड. अण्णासाहेब शिंदे व स्वागताध्यक्ष मा. नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांनी सर्व समाज बांधवाना व भगिनींना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/WhatsApp-Image-2023-01-20-at-15.26.29-884x1024.jpeg)