ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

… तरच झोपलेल्या सरकारला जाग येईल

आता केवळ उपोषण नव्हे, आमरण उपोषण करणार, विश्वकल्याण कामगार  बजाज अॅटो संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांचा इशारा

वडगाव मावळ : आंदोलनामुळे सरकार राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यावर तोडगा काढते, पण इथे १६ दिवस झाले कामगारांचे  कुटूंबीयांसह रस्त्यावर उतरून आंदोलन चालू आहे तरी देखील सरकारला जाग येत नाही हे दुर्दैव आहे हे सरकार झोपले असून त्यांना आता जागे करण्यासाठी उपोषन ऐवजी आमरण उपोषण हा मार्ग निवडला पाहिजे, असा इशारा विश्वकल्याण कामगार  बजाज अॅटो संघटनेचे अध्यक्ष  दिलीप पवार यांनी केले.

रविवार खासदार ओमराजे निंबाळकर,  मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठविधी तज्ञ डाॅ डी एल कराड, अजित अभ्यंकर, गणेश दराडे, अरविंद श्रोती, मिलिंद रासने, वसंत पवार, यांच्या सह अनेक मानयवरांनी भेट दिली. यावेळी ओमराजे निंबाळकर म्हणाले हिंदू संस्कृतीचा  नवरात्र  हा सन खूप महत्वाचा आहे. मात्र कामगारांच्या कुटूबीयांना हा सण सजरा करता आला नाही हिंदुत्ववादी सरकारला याची जाणीव कधी होणार नाही.

अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर 
डी एल कऱ्हाड म्हणाले मंत्री, आमदार, खासदार हे काही कामाचे नसतात, तुमचे पालकमंत्री अजित पवार आहेत.त्यांच्यात हिम्मत असेल तर हुंडाई कंपनीला सांगाव की हे कामगार माझे आहेत त्यांना कंपनीत घेतल्या शिवाय मी कंपनी सुरू करून देणार नाही.

सरकारच्या मंत्र्यांची आंदोलनाकडे पाठच…
आपल्या मागण्यांसाठी जनरल मोटर्स क॔पनीच्या कामगारांनी महात्मा गांधी जयंतीपासून वडगाव एमआयडीसी फाट्यावर साकळी उपोषनाला सुरुवात केली. आतापर्यंत अनेक आमदार, खासदार, विविध पक्षातील पदाधिकारी, विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून भाषने केली,  या आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला, आम्ही सरकार तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडू अशी अनेक आश्वासने विरोधी पक्षासह विविध नेत्यांनी दिली मात्र अध्याप सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी ना फिरकला ना तोडगा निघाला त्यामुळे गेल्या सोळा दिवसापासुन या  कामगारांचे आंदोलन सुरूच आहे.

घटस्थानपना विना महिला,देवीला केला नवस
हिंदू संस्कृती नवरात्र सन हा महिलांचा असतो, महिला घटनास्थपना करतात, नऊ दिवस  कडक उपोवास करतात, मात्र गेल्या सोळा दिवसापासुन महिला आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना ऐन  नवरात्र सनात घरोघरी ना घटस्थापना करता आली मात्र महिलांनी कडक उपास करून देवीला साकडे घातले आहे की आमची रोजी रोटी वाचव आम्हाला न्याय देण्यासाठी या सरकारला चांगली बुध्दी दे असा नवस केल्याची माहिती आंदोलक महिलांनी दिली

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button