Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार’; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Diesel Rate : राज्य परिवहन महामंडळ (एसटी)ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलली असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी डिझेल खरेदी प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेमुळे आता एसटीला प्रति लिटर तब्बल ५.१३ रुपयांची सवलत मिळणार असून, यामुळे दरवर्षी सुमारे २४० ते २४१ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

पूर्वी एसटीला डिझेलवर केवळ २.७० रुपयांची सवलत मिळत होती, जी वाढवून ३ रुपये करण्यात आली होती. मात्र, नव्या पारदर्शक प्रक्रियेमुळे ही सवलत आणखी वाढली आहे.

यासोबतच एसटी आता इंधन विक्रीच्या क्षेत्रातही उतरणार असून, पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलएनजी यांसारखी सर्व प्रकारची इंधने एसटीच्या पंपांवर उपलब्ध केली जाणार आहेत. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) १०० ते ११० मल्टी-मॉडल इंधन पंप उभारण्याची योजना असून, यातून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा –  पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

इंधन चोरी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी एसटी पंपांवर एआय-आधारित सेन्सर्स बसवले जाणार आहेत. सध्याच्या प्रणालीत दर १०० लिटरमागे ४ ते ५ लिटर इंधनाची हानी होत असल्याचे समोर आले असून, नव्या तंत्रज्ञानामुळे ही गळती थांबवली जाणार आहे.

दरम्यान, एसटीच्या २५१ डेपो आणि ६०० हून अधिक बस स्थानकांवर डिजिटल जाहिरातींद्वारे पुढील पाच वर्षांत सुमारे २५० कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, ऊर्जा खर्च कमी करण्यासाठी डेपो आणि स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असून, यातून दरवर्षी १० ते १५ कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे.

सध्या एसटीवर सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तूट असून, चालू आर्थिक वर्षातही तोटा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि आत्मनिर्भरता यावर भर देत एसटीला मजबूत आणि शाश्वत सेवा बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button