Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

कुख्यात गुंडाला विधानसभा उपाध्यक्षांनी भरवला केक!

पालकमंत्र्यांनी समज देऊनही अण्णा बनसोडे यांचा प्रताप

गुंड आक्क्या बॉण्ड वर तब्बल 16 गंभीर गुन्हे दाखल

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

विधानसभा उपाध्यक्ष पदावर असल्याने आता व्यवस्थित वागले पाहिजे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्याला अण्णा बनसोडे यांनी केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. अण्णा बनसोडे आणि कुप्रसिद्ध गुन्हेगार आकाश मोहोळ उर्फ आक्या बॉण्ड हे एकमेकांना केक भरवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तब्बल १६ गंभीर गुन्हे दाखल असणार्‍या आक्क्या बॉण्ड याच्यासोबत अण्णा बनसोडे यांनी वाढदिवस साजरा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा ४ मे रोजी वाढदिवस साजरा झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. मात्र, कुख्यात गुन्हेगार आक्या बॉण्ड हा अण्णा बनसोडे यांच्यासाठी चक्क केक आणि पुष्पगुच्छ घेऊन आला. यावेळी अण्णा बनसोडे आणि आक्या बॉण्ड यांनी एकमेकांना केक भरवत वाढदिवस साजरा केला आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आक्क्या बॉण्ड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध तब्बल १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ’मोक्का’ अंतर्गत कारागृहात असणार्‍या आक्क्याची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे.

हेही वाचा   :    Mock Drills | देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये युद्ध सरावांचा ‘मॉक ड्रिल’; नेमकं काय-काय होणार?

विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अण्णा बनसोडे यांचा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरून बोलताना अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना मोलाचा सल्ला दिला होता. विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांची मुर्ती लहान, पण किर्ती महान आहे, असे कौतुक करतानाच आता सकाळी लवकर कामाला लागा, लोकांना वेळ द्या, विधानसभेला वेळ द्यावा लागेल. जेवढे महत्वाचे पद, तेवढे जास्त कष्ट घ्यावे लागतात. तुमच्या चिरंजीवाला जरा समजावून सांगा. घरातील व्यक्तीने चुकीचे कृत्य केल्यास स्वत:ची, पक्षाची, सरकारची बदनामी होते, असा सल्ला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बनसोडे यांचे कान टोचले होते. मात्र, अजितदादांनी दिलेल्या या मोलाच्या सल्ल्याचा अण्णा बनसोडे यांना आपल्या वाढदिवसा दिवशीच विसर पडला. वाढदिवसानिमित्त कुप्रसिद्ध गुन्हेगाराला केक भरवल्याचा आणि त्याच्याकडून केक खाल्ल्याचा फोटो व्हायरल झाल्याने शहरात चर्चा रंगली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button