Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

Mock Drills | देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये युद्ध सरावांचा ‘मॉक ड्रिल’; नेमकं काय-काय होणार?

Mock Drills | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढलाय. युद्धाचे ढग निर्माण झालेत. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना उद्या (७ मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत.

केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात १६ ठिकाणी मॉक ड्रिल होणार

मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

हेही वाचा   :  पिंपरी चिंचवडच्या मुली हुशार!!

मॉक ड्रीलमध्ये काय होणार?

  • मॉक ड्रिलमध्ये गृह मंत्रालयाने पाच गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत.
  • ज्यामध्ये हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून नागरिकांना अलर्ट करणे.
  • हल्ला झाल्यास नागरिकांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? याचं ट्रेनिंग दिलं जाणार.
  • रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर ब्लॅकआऊट कसे करायचे?
  • हल्ल्यावेळी काही पडझड अथवा दुखापत झाल्यास जखमींवर उपचार कसे करायचे हे सांगितले जाणार.
  • हल्ल्यावेळी नागरिकांचे स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव केला जाणार

सायरन वाजल्यावर काय करालं?

  • सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका.
  • ५ ते १० मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा.
  • मोकळ्या जागेपासून लांब रहा.
  • घरात आणि सुरक्षित इमारतींमध्ये प्रवेश करा.
  • टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.
  • अफवांवर विश्वास ठेऊ नका प्रशासनाच्या सूचनांच पालन करा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button