breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

प्रभाग रचना कशीही असो, भाजपाला लोक नाकारतील : आमदार अण्णा बनसोडे

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेली प्रभाग रचना नियमाला धरुनच असेल. काही आक्षेप असतील तर निश्चितपणे नोंदवले जातील. प्रभाग रचना कशीही असो, पण भाजपाला आता पिंपरी-चिंचवडमधील नागरिक नाकारतील, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी प्रभाग रचना प्रसिद्ध केली. याबाबत आमदार बनसोडे यांनी ‘महाईन्यूज’शी बोलताना प्रतिक्रिया दिली.

आमदार बनसोडे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्ता होती. त्याकाळात झालेली विकासकामे येथील नागरिकांनी पाहिली आहेत. गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजपाची सत्ता होती. भाजपाची सत्ता असतना राज्यातील एकही पदाधिकारी पिंपरी-चिंचवडकरांच्या अडचणी सोडवण्यासाठी आला नाही. मात्र, अजित पवार शहरातील समस्यांबाबत जातीने लक्ष घालतात, ही वस्तुस्थिती आहे.

सत्ताधारी भाजपाने २०१७ मध्ये दिलेली आश्वासनांमध्ये एकही आश्वासन पाळले नाही. उलट, शहराच्या प्रगतीला खोडा बसला. आता प्रभाग रचना अनुकूल असल्याबाबत भाजपा कितीही दावा करीत असेल. पण, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच बहुमताचा आकडा पार करेल, असा विश्वासही आमदार बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button