Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘अनुदान कधी मिळेल याचा काहीही भरोसा नसतो’; नितीन गडकरींचं विधान

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकीय विषयांवरही स्पष्टपणे बोलतात आणि स्पष्ट भूमिका मांडताना अनेकदा पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची अनेकदा चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं. आता त्यांच्या आणखी एखा विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित उद्योगांसंदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना गुंतवणुकदारांना एक सल्ला दिला आहे.

नितीन गडकरी म्हणाले, माझं तर म्हणणं आहे की कोणत्याही पक्षाचं सरकार असूद्या. गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवलं पाहिजे. सरकार हे विषकन्या असते. ज्यांच्या बरोबर जाते त्यांना बुडवते. तुम्ही त्यांच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे घ्या. मात्र, अनुदान कधी मिळेल, कधी नाही याचा काहीही भरोसा नसतो.

हेही वाचा     –      सोसायटीधारकांच्या पाणी पुरवठाबाबत प्रशासनाचा ‘‘वॉच’’

एका जणाने सांगितलं की साडेचारशे कोटी अनुदान आले आहे. टॅक्सचे पैसे जमा आहेत. पुढे त्यांनी विचारलं की पण ते पैसे कधी मिळतील? मी त्यांना म्हटलं परमेश्वराला प्रार्थना करा. कारण काही भरोसा नाही. मग मिळणार का? जेव्हा येईल तेव्हा मिळू शकतात. अनुदानाचे पैसे मिळतील का? याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button