”महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही..”; नितीन गडकरींचं वक्तव्य

Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या परखड शैलीत वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्राह्मण समाजाच्या स्थानाबद्दल भाष्य केले. नेहमीच जात, धर्म आणि पंथ यांना राजकारणात महत्त्व न देण्याची भूमिका घेणाऱ्या गडकरींनी यावेळी स्वत:च्या ब्राह्मण जातीच्या संदर्भात बोलताना, महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही, असे सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले, की शिक्षण ही आपली शक्ती आहे. शिक्षण घेतल्याशिवाय कुठल्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. आज अनेक लोक ट्रक ड्रायव्हर, चहाचे दुकान अशी छोटी कामे करताना दिसतात. त्यांच्यामध्ये चांगली कला कौशल्य असूनही केवळ शिक्षणा अभावी ते मागे पडलेले आहेत. त्यामुळे सगळ्या भाषांचे शिक्षण चांगले शिक्षण घ्यावे असं आव्हान त्यांनी केले. शिक्षण घेत असताना पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला खूप गुण मिळाले म्हणजे तुम्ही यशस्वी झाला तसे नाही. मी विधी अभ्यासक्रमात असताना मागच्या बाकावर बसणारे आज मोठे वकील झाले तर गुणवत्ता यादीत आले नाही.
हेही वाचा : अमली पदार्थ विक्रेत्यांवर ‘मोक्का’ लावण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मी स्वत: ब्राह्मण असूनही महाराष्ट्रात आमच्या जातीला फार महत्त्व नाही. इकडे आमची फार चालत नाही. मात्र, उत्तर भारतात ब्राह्मणांना फार महत्त्व आहे. तिकडे दुबे, चतुर्वेदी यांची चलती असते. राजकारणामध्ये त्यांचे प्राबल्य आहे. एकदा उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाला गेले असता व्यासपीठाने एकाने सांगितले की, अटल बिहारी यांच्यानंतर आमच्या समाजाती एका नेत्याच्या आम्हाला गर्व आहे. आज गडकरींना संपूर्ण देश ओळखतो, असेही ते म्हणाले. यावर गडकरींनी त्यांना खडसावून सांगितले. मी कुठल्याही जाती, धर्माला मानत नाही. त्यामुळे मी केवळ तुमचा नसून सर्व समाजाचा आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.





