breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘अशा ठिकाणी पाठवू की बायकोला फोनही लागणार नाही’; नितेश राणेंची पोलिसांना धमकी

Nitesh Rane | उरण आणि धारीवी हत्याप्रकणी पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सालगीमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लव्ह जिहादवर भाषण करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंनी थेट पोलिसांनाच धमकी दिली. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असं ते म्हणाले.

नितेश राणे म्हणाले, सरकार हिंदूचे आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्हाला जर तुमच्या पोस्टवर मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की जिथून बायकोचा फोनपण लागणार नाही. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो.

हेही वाचा     –      नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री सचिवालयाकडून निर्णय जाहीर 

अर्ध्या तासात तक्रार घ्यायची, अन्यथा धिंगाणा घालू

पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button