‘..नाहीतर चपला खाशील’; निलेश राणेंची आदित्या ठाकरेंवर टीका
![Nilesh Rane said that stop lying or you will eat shoes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/aditya-thackeray-and-nilesh-rane-780x470.jpg)
आदित्य ठाकरेसारखा बोगस भंपक माणूस महाराष्ट्रात दुसरा नाही
मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेनिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान सभेच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. यावरून निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. झेड प्लस सुरक्षेसाठी आदित्य ठाकरेंनी कट रचला, असा आरोप निलेश राणेंनी केला आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंवर देखील टीका केली आहे.
आदित्य ठाकरेसारखा बोगस भंपक माणूस महाराष्ट्रात दुसरा नाही. दगडफेकीचा ड्रामा तयार केला. स्वतःच्याच लोकांना दगड मारायला लावले. स्वतःच झेड प्लस संरक्षण करायचं आहे म्हणून हे नाटक आहे. अंबादास दानवेंच्या जिल्ह्यात त्यांचा नेता दगड खातो याची त्यांना लाज वाटायला पाहीजे. खरंतर राजीनामा दानवेंनी द्यायला हवा. वरून जर बाळासाहेब बघत असतील की आपला नातू दगडी खातोय तर वरून तुमच्यावर चप्पला फेकतील. आदित्य ठाकरे आता दगडी खातोयस, खोटं बोलायचं थांबव नाहीतर चपला खाशील. अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी राणेंच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरेंनी राणेंचं नाव घेताच उद्विग्न प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे, शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही, असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं आहे.