शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हा संदर्भात निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय
![Next hearing regarding Shiv Sena's bow and arrow symbol on 20 January 2023](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/eknath-shinde-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
केंद्रीय नवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी 20 जानेवारी 2023 ला
मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव कोणाला मिळणार? याबाबत काही महिन्यापासुन केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होती. आज 4 वाजता केंद्रीय नवडणूक आयोगासमोर या संदर्भात सुनावणी सुरू करण्यात आली होती. या प्रकरणी निवडणुक आयोगापुढे आज सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी 20 जानेवारी 2023 ला होणार आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तीवाद
शिवसेनेतील फूट ही एक काल्पनिक कथा आहे. शिवसेनेत दाखवलेल्या फुटीला काहीही अस्तित्व नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे. शिवसेनेतील फुट आयोगाने ग्राह्य धरू नये.
शिंदे गटाने दाखल केलेली कागदपत्रे बोगस आहेत. या कागपत्रांमध्ये त्रुटी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा. अंतिम निकाल देण्याची घाई आयोगाने करू नये. शिंदे गटाचे आमदार, खासदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले आहेत. पक्षात असताना कोणीही पक्षाच्या घटनेवर आक्षेप घेतला नाही.
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केलेला युक्तीवाद
आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे चिन्हाचा निर्णय तातडीने घ्यावा. पक्षाचा मोठा गट लोकप्रतिनिधींसोबत बाहेर पडल्यास तो बेकायदेशीर कसा? सर्वात जास्त आमदार आणि खासदार शिंदे गटात आहेत.
शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणत्याही त्रुटी नाहीत. धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत आवश्यक आहे ते बहुमत शिंदे गटाकडे असल्याचं जेठमलानी म्हणाले.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना गेल्यास त्या दृष्टीने तयारी करण्यास सुरवात केली होती. धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळाला तर उद्धव ठाकरे स्वतः शिवसैनिकांना व सर्वसामान्य जनतेला नवीन चिन्हासाठी आवाहन करतील अशी माहिती सुद्धा मिळाली आहे. दरम्यान पुढच्या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय येणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.