breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडूंना सुनावली दोन वर्षांची शिक्षा!

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सुनावली शिक्षा

मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे चांगलेच भोवलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने याबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

२०१७ साली दिव्यांगांच्या मागण्यासाठी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर बच्चू कडू धावून गेले होते. त्या खटल्यात नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने जिल्हा न्यायालयात दमदाटी करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा दोन प्रकरणांमध्ये त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, प्रहारच्या माध्यमातून नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, याबाबत आंदोलन सुरू होते. यावेळी प्रहारच्या शिष्टमंडळाकडून तत्कालीन आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. यावेळी आमदार बच्चू कडू आणि तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात चकमक झाली होती. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी गुन्हा नोंदविला होता. दरम्यान या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी १ तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी १ अशी २ वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button