‘शिवसेनेचे ‘ते’ १६ आमदार अपात्र ठरणार’; नरहरी झिरवाळ यांचं मोठं विधान
![Narhari Zirwal said that 16 MLAs of Shiv Sena will be disqualified](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Narhari-Zirwal-780x470.jpg)
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय प्रक्रिया तातडीने घेण्यात यावी यासाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता या आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मोठं विधान केलं आहे.
नरहळी झिरवाळ म्हणाले की, सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत, पण हा निर्णय शेवटी अध्यक्षांकडे असेल, त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत त्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणे उचीत ठरणार नाही.
हेही वाचा – मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिस पाठविल्या आहेत. या ५४ आमदारांना नोटिसीवर उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला आहे. याबाबतचा निर्णय १० ऑगस्टपूर्वीच होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.