“भारतात जूनपर्यंत आर्थिक मंदी येण्याची शक्यता”; नारायण राणे
![Narayan Rane said that there is a possibility of economic recession in India by June](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/narayan-rane-1-780x470.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करत आहोत
पुणे : जी-2० परिषदेला आजपासून पुण्यात सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यांच्या हस्ते आज परिषदेचे उद्घाटन करण्यात आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करणार आहेत.
मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, जी २० या जागतिक परिषदेचे उदघाटन माझ्या हाताने झाले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करत आहोत, आपल्या जीडीपीमध्ये कमालीची वाढ होत असून आठ वर्षापूर्वी आपला देश १० व्या क्रमांकावर होता. आपला आता देश ५ व्या क्रमांकावर आहे. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. येत्या १० वर्षांत आपण तिसर्या क्रमांकावर जाऊ, अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.
जगातील मोठ्या देशांना आर्थिक मंदीची भीती सतावते आहे. भारतात जून नंतर मंदी येण्याची शक्यता आहे. मंदीची झळ सामान्य नागरिकांना पोहचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.
अमेरिकेचा जी डी पी २० ट्रिलियन आहे. भारत ५ ट्रिलियनपर्यंत पोहचू पाहत आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक स्थिती भारताची सुधारावी. यासाठी केंद्र सरकारमार्फत विशेष उपाययोजना केल्या जात आहे. तसेच जी २० परिषदेमध्ये देखील यावर चर्चा होणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर परिषदेत विशेष चर्चा होणार असून केंद्र सरकार युद्ध पातळीवर पावल उचलत असल्याचे राणे यांनी सांगितले.