breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘मी दादागिरी करतो, पण मी दादा नाही तर नाना आहे’; नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला

मुंबई : महाविकास आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडनुका एकत्रित लढणार आहे. जागापाटपाचा फॉर्मुलाही ठरल्याची चर्चा आहे. दरम्यान, जागापाटपाचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला नाही. मी दिल्लीत जाणार आहे त्यानंतर हायकमांडशी चर्चा करणार आणि मग महाराष्ट्रात काय करायचं याचा निर्णय घेऊ, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

माझं नाव नाना आहे, दादा नाही. नाना म्हणजे कुटुंब प्रमुखाला आपल्याकडे म्हटलं जातं. मी त्याच भूमिकेत आहे, पक्ष पुढे घेऊन जातो आहे. मात्र काहीजण माझ्यावर आरोप करतात की मी दादागिरी करतो. पण मी दादा नाही तर नाना आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे, राजकारणात आम्ही विजयाची घौडदौड कायम ठेवू आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ, अस नाना पटोले म्हणाले.

देशातील उद्ध्वस्त करणारी व्यवस्था आहे ती व्यवस्था सर्वात आधी दूर करणं म्हणजेच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचं मुख्य लक्ष्य आहे. भाजपाचं महाराष्ट्रातून उच्चाटन कसं होईल ते लक्ष्य ठेवून आम्ही प्रचाराला लागतो आहोत. कसब्यात भाजपाची काय अवस्था ते आपण पाहिलं. अमरावतीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला. भाजपाला वाटतं आहे आम्ही सत्तेत अमर पट्टा बांधून आलो आहोत तो पट्टा उतरवण्याची सुरूवात जनतेने केली आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button