ठरलं तर! चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांची घोषणा
चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधानानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राष्ट्रवादीकडून आपला उमेदवार जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.