TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

महिलाशक्तीच्या रॅलीद्वारे नाना काटे यांच्या प्रचाराचा समारोप..!

चिंचवड : ‘नाना काटे, आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘येऊन येऊन येणार कोण? नानांशिवाय आहेच कोण’, शीतलताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा विविध घोषणा देत शुक्रवारी काढण्यात आलेल्या रॅलीने चिंचवड मतदारसंघ दणाणून गेला होता. माजी नगरसेविका तथा महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या सुविद्य पत्नी शीतल काटे यांनी शुक्रवारी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील विविध भागातून काढलेल्या रॅलीला महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदारसंघाच्या विकासासाठी नाना काटेंनाच निवडून आणण्याचा निर्धार या रॅलीत सहभागी झालेल्या महिलाशक्तीने केला.

या रॅलीत शीतल काटे यांच्यासमवेत आमदार निलेश लंके, माजी नगरसेवक शंकर काटे, राष्ट्रवादी काँग्रेस नगर जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, हे खरंच असावं. कारण नाना काटे यांच्या पाठीमागे नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या पत्नी नगरसेविका शीतल काटे काम करत आहेत. एक स्त्री जसे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेते, तसेच शीतल काटे आपल्या प्रभागातील प्रत्येक स्तरातील नागरिकांच्या अडी अडचणी सोडवतात. मग आता त्यांना आम्ही पाठिंबा देणारच, अशी भावना यावेळी महिलावर्गाने व्यक्त केली.

शीतल काटे यांनी महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले. बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळवून दिली. त्यांच्या अथक प्रयत्नांनी पिंपळे सौदागर परिसरातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या. याशिवाय युवतींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण, व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. नाना काटे आणि शीतल काटे हे उभयंता त्यांच्या प्रभागासारखेच संपूर्ण चिंचवड मतदारसंघाचाही कायापालट करतील, याची आम्हाला खात्री असल्यामुळेच आम्ही नाना काटे यांनाच प्रचंड मते देऊन निवडून आणणार असल्याचे या रॅलीतील महिलांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button