breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागातील सोसायट्यांमधील नागरिकांशी नाना काटे यांनी साधला ऑनलाईन संवाद!

पिंपरी |

पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागातील सोसायट्यांमधील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला आहे. नाना काटे यांच्या वतीने रविवार दि.३० रोजी ऑनलाईन मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून करोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना प्रत्यक्षात भेटता आले नाही. म्हणून ऑनलाइन संवाद या उपक्रमाअंतर्गत परिसरातील सोसायटी व नागरिकांसोबत सहकार्यांसमावेत ऑनलाईन मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्यक्ष संवाद साधून रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभागातील नागरिकांच्या विशेषतः सोसायटी मधील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी या मिटिंगचे आयोजन केले होते.

या मिटिंगमध्ये सोसायटींचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार व कमिटी सदस्य सभासदांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सोसायटीच्या अडचणी मांडल्या. तसेच नाना काटे आणि त्यांच्या टीमने कोरोना काळात केलेल्या सहकार्याचे व कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर काही चांगले सल्ले पण दिले. काही नागरिकांनी प्रभागातील होत असलेल्या विकास कामाबाबत प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची नाना काटे यांनी माहिती दिली. तसेच लॉकडाऊन काळात सर्व आय.टी. नोकरदार नागरिक घरातून काम करत आहेत. त्यांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. महावितरण विभागाकडून कसलाही मेसेज किंवा कल्पना नसल्यामुळे वीज परत कधी येईल याची माहिती नसते, त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. त्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन नाना काटे यांनी दिले. तसेच ऑनलाइन सभेला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन व्यक्त झाल्याबद्दल व करोना काळात सोसायटी सभासदांनी केलेल्या कामाचे देखील कौतुक व आभार नाना काटे यांचा वतीने करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button