पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी ‘‘नमो संवाद’’
भोसरी विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी बैठका
![Namo dialogue to strengthen PM Modi's hand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Mahesh-Landge-1-780x470.jpg)
भाजपा आमदार महेश लांडगे यांचा नियोजनबद्ध प्रचार
पिंपरी । प्रतिनिधी
‘बलशाली भारताचे’ स्वप्न साकार करण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान केले पाहिजे. ‘‘शेवटच्या घटकाचा विकास…’’ हाच भाजपा महायुतीचा नारा असून, सर्वसामान्य जनता महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहील, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या यशस्वी वाटचालीतील महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि कल्याणकारी योजना याची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ‘‘नमो संवाद ’’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा – देशातल्या निवडणुका EVMवरच होणार; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांच्या नेतृत्त्वाखाली भोसरी विधानसभा मतदार संघात आतापर्यंत २० ठिकाणी ‘नमो संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, बूथ प्रमुख, मंडल प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.
दिघी, चऱ्होली, मोशी जाधववाडी, गंधर्व नगरी आदी परिसरात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच, शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी ‘‘नमो संवाद’’ हा उपक्रम घेण्यात आला आहे. बूथ प्रमुख ते मतदार यांच्यापर्यंत भाजपा महायुतीचा विचार आणि कार्य पोहोचवण्याचा निर्धार असून, या माध्यमातून ‘अबकी बार ४०० पार’’ चा नारा यशस्वी करण्याचा संकल्प आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
– प्रिया बेर्डे, प्रदेशाध्यक्षा, सांस्कृतिक प्रकोष्ठ, भाजपा.
‘नमो संवाद’च्या माध्यमातून गेल्या १० वर्षात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या विविध योजना व महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प तसेच, देशाच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय याची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.