‘माझ्या जिवाला धोका’; आमदार बच्चू कडूंचं थेट पोलिस अधीक्षकांना पत्र
अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षकांना लिहिले आहे. त्यांनी पोलिसांना चौकशी करून योग्य ती कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आमदार कडू यांनी सदर पत्रात माझा अपघात झाला, अशाप्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघाताची कुणीतरी अफवा पसरवत आहे. असा दावा त्यांनी पत्रात केला आहे. राजकीय वर्तुळात या पत्रामुळे खळबळ उडाली. बऱ्याच दिवसांपासून अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न या फोनवरून विचारले जातात.
हेही वाचा – कृषी निविष्ठांच्या विक्रीसंबंधातील तक्रार व्हॉट्सॲपवर करता येणार
फोन करणाऱ्यांनाच याबाबत जाब विचारला तर धमक्या येत असल्याचा प्रकार समोर आला, असे कडू यांनी एसपींना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. गोपनीय माहितीनुसार, माझ्या जिवाला धोका असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. संबंधितावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.