किरीट सोमय्या यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू
मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. किरीट सोमय्या यांना भाजप पाठीशी घालणार का? असा सवाल विरोधकांनी विधान परिषदेत केला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीची घोषणा केली आहे. दरम्यान, फडणवीसांच्या आदेशानंतर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणातील तपास सुरू केला आहे. तांत्रिक आणि सायबर तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट १० या व्हिडीओमागची सतत्या तपासणार आहेत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती
BJP leader Kirit Somaiya viral video case | Crime Branch of Mumbai police have started an investigation into the matter. With the help of technical experts and cyber experts, Crime Branch Unit 10 will investigate the authenticity of the video. Deputy CM Devendra Fadnavis has…
— ANI (@ANI) July 18, 2023
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उचलून धरला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना प्रेन ड्राईव्ह सादर करत याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिलेला पेनड्राइव्ह मी महिला पोलीस अधिकारी आणि महिला डॉक्टरांच्या मदतीने तपासणार आहे. आपली सभागृहातील चर्चा ऐकून या प्रकरणात शोषण झालेल्या महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आले पाहिजे. यापूर्वी अनेक महिला सभागृहातील चर्चा ऐकून तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आल्या आहेत, या महिलेने देखील पुढे यावे, असं आवाहन नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.