breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अमित ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल..

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचा दावा मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. महेश जाधव असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत.

माथाडी संघटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो होतो. तिथे मला अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. दरम्यान, या मारहाणीनंतर जाधव यांना खारघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असा दावा महेश जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या कपाळावरून ओघळणारं रक्त दिसतंय, तसेच त्यांच्या चेहऱ्याला झालेली दुखापतदेखील स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा   –    रोहित शर्माला हे ५ विक्रम करण्याची संधी, कोहलीचा ‘विराट’ रेकॉर्ड निशान्यावर

महेश जाधव नेमकं काय म्हणाले?

मी काही माथाडी कामगारांना घेऊन न्याय मागण्यासाठी अमित ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काचं काम मिळावं यासाठी मी भांडत होतो. परंतु, अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मित्र विनय अग्रवाल याच्या सांगण्यावरून मला मारहाण केली. मी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंना एवढंच सांगेन, मला मारायचं असेल तर जीवे मारा पण मी तुमच्यापैकी कोणालाही सोडणार नाही. सतत मराठी-मराठी करायचं आणि मराठीच्या नावाखाली आपल्याच माणसांवर अन्याय करायचा, असं सगळं त्यांचं चालू असतं.

ठाकरे मराठी माणसाचे कैवारी नाहीत. हे थोतांड आणि दलाल आहेत. राज ठाकरेंचा पक्ष दलाल आहे. हा केवळ वसुली करणारा पक्ष आहे. या फेसबूक लाईव्हनंतर ते लोक माझा जीव घेतील, मला मारून टाकतील. राज आणि अमित ठाकरे यांच्या लोकांनी मला राजगड (पक्ष कार्यालय) येथे मारहाण केली. मी तिथून कसाबसा जीव वाचवून पळून आलोय. या माथाडी कामगारांनी मला वाचवलं आणि तिथून पळवून आणलं, असंही महेश जाधव म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button