गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार!
माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांचे मत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Shantaram-Bhalekar-780x470.jpg)
रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळास कबड्डी मॅट सुपूर्द
पिंपरी। प्रतिनिधी
खेळाडूंच्या आणि कलाकारांच्या बाबतीत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचे नेहमीच विशेष सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ बौद्धिकदृष्ट्या गुणवान न होता शारीरिक दृष्ट्या सुद्धा सदृढ होणे गरजेचे आहे. शहरात दर्जेदार खेळाडू घडावेत. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांचा सकारात्मक पुढाकार असतो, असे मत माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी व्यक्त केले.
रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप माध्यमिक व सौ. अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये पुणे जिल्हा क्रीडा अधिकार्यांच्या वतीने व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या विशेष सहकार्यातून विद्यार्थ्यांसाठी ‘इनडोअर’ कबड्डी खेळण्यासाठी कबड्डी मॅट प्रदान करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे खजिनदार भागवत चौधरी, समन्वय समितीचे अध्यक्ष संपत भालेकर, धनंजय वर्णेकर, रमेश भालेकर, अस्मिता भालेकर, अनिल भालेकर, सचिव सूर्यकांत भसे, रामदास कुटे, ज्ञानेश्वर भालेकर, प्राचार्य सुबोध गलांडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था समन्वय समितीचे अध्यक्ष संपत भालेकर होते.
हेही वाचा – रात्रभर फोन चार्जिंगला लावताय? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकते मोठे नुकसान
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव वसे म्हणाले की, संस्थेला क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. मुलांसाठी चांगले मैदान आहे. खेळाचे साहित्यही उपलब्ध करून दिले जाईल. परंतु त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी आवश्य लाभ घेतला पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत भालेकर यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य सुबोध गलांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी संस्थेला आमदार महेश लांडगे यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.
गुणवंत खेळाडून निर्माण व्हावे : शांताराम भालेकर
शाळेसाठी लागणार्या आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे सदैव सहकार्य लाभणार आहे. ओपन जीमसाठी लागणारे साहित्य, लॉज बॉल साठी लागणारे मैदान, तसेच गुणवान विद्यार्थ्यांच्या विकासासाठी लागणार्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्थेला आवश्यक असणारे सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे. शाळेची गुणवत्ता अत्यंत चांगली असल्यामुळे या संस्थेतून अतिशय गुणवंत खेळाडू ही निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षाही माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी व्यक्त केली.