मिशन विधानसभा निवडणूक : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ४८ उमेदवारांची यादी जाहीर!
विद्यमान आमदारांना उमेदवारी : वादाच्या जागांवर लगोलग उमेदवार जाहीर करणे टाळले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Shankar-Jagatap-2-780x470.jpg)
मुंबई : महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांच्याशी जागा वाटपासंबंधी अनेक बैठका पार पडल्यानंतर, तिन्ही पक्षांच्या समन्वयातून अंतिम समीकरण ठरल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने गुरुवारी ४८ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. काँग्रेस पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षप्रमाणे विद्यमान आमदारांना स्थान दिलेले आहे. तर वादाच्या जागांवर लगोलग उमेदवार जाहीर करणे टाळले आहे.
गेली अनेक दिवस शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून जोरदार तंटा सुरू होता. विशेषत: विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर दोन्ही पक्षांत खेचाखेची सुरू होती. काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले यांच्यात तर काही जागांवरून अक्षरश: शाब्दिक युद्ध झाले. त्यामुळे जागावाटपाच्या अनेक बैठका पार पडूनही अंतिम समीकरण निश्चित होत नव्हते. महाविकास आघाडी तुटतेय की काय? अशा चर्चाही यामुळे झाल्या. अशा सर्व कारणांमुळे अखेर काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली.
काँग्रेसची उमेदवारी जाहीर पुढीलप्रमाणे
1. मीनल पाटील नायगाव
2. सुरेश वरपूडकर -पाथरी
3. विलास अवताडे -फुलंब्री
4. सय्यद हसन -मीरा भाईंदर
5. असलम शेख -मालाड वेस्ट
6. मोहम्मद अरिफ नसीम खान -चांदीवली
7. डॉ. ज्योती गायकवाड -धारावी
8. अमीन पटेल -मुंबादेवी
9. संजय जगताप -पुरंदर
10. संग्राम थोपटे -भोर
11. रवींद्र धंगेकर -कसबा पेठ
12. बाळासाहेब थोरात -संगमनेर
13. प्रभावती घोरगे -शिर्डी
14. धीरज देशमुख -लातूर ग्रामीण
15. अमित देशमुख -लातूर शहर
16. सिद्धराम मेहत्रे अक्कलकोट
17. पृथ्वीराज चव्हाण -कराड दक्षिण
18. ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण
19. राहुल पाटील करवीर
20. राजू आवळे -हातकणंगले
21. विश्वजीत कदम -पलूस कडेगाव
22. विक्रम सिंह सावंत -जत
23. के सी पाडवी -अक्कलकोट
24. राजेंद्र कुमार गावित -शहादा
25. किरण ताडदेववी -नंदुरबार
26. श्रीकृष्ण कुमार नाईक -नवापूर
27. प्रवीण चौरे -साखरे
28. कुणाल पाटील -धुळे ग्रामीण
29. धनंजय चौधरी -रावेर
30. राजेश एकांडे -मलकापूर
31. राहुल बोंद्रे -चिखली
32. अमित झनक -रिसोड
33. वीरेंद्र जगताप -धामणगाव रेल्वे
34. सुशील देशमुख -अमरावती
35. यशोमती ठाकूर – तिवसा
36. अनिरुद्ध देशमुख -अचलपूर
37. रणजीत कांबळे -देवळाली
38. प्रफुल गुदाढे -नागपूर दक्षिण पश्चिम
39. बंटी शेळके -नागपूर मध्य
40. विकास ठाकरे -नागपूर पश्चिम
41. नितीन राऊत -नागपूर उत्तर
42. नाना पटोले -साकोली
43. गोपीदास अग्रवाल -गोंदिया
44. सुभाष ढोले -राजुरा
45. विजय वडेट्टीवार -ब्रह्मपुरी
46. सतीश वारुंजकर -चिमूर
47. महादेवराव पवार -आडगाव
48. तृप्ती कदम कोंडेकर -भोकर