ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन विधानसभा । चिंचवडमधील ‘इंडिया आघाडी’त नवा खेळाडू; ‘आप’ ॲक्शन मोडवर!

माजी शहराध्यक्ष चेतन बेंद्रे मोठ्या ताकदीने चिंचवड विधानसभेच्या मैदानात !

पिंपरी : आम आदमी पक्षाचे माजी शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या फडात शड्डू ठोकला असून, https://chinchwadchachetan.com ही वेबसाईट लॉन्च करत विधानसभेसाठी कँम्पेन सुरू केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ‘आप’ ने मोठ्या जोमाने कंबर कसली आहे. विधानसभेसाठी राज्यात ‘आप’ च्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि वरिष्ठ नेत्यांनी त्या दृष्टीने आदेशही दिले आहेत. त्यामुळे ‘इंडिया आघाडी’ किंबहुना महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’ लावलेल्या इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे.

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात आयटी वर्ग मोठ्या प्रमाणावर स्थिरावला आहे. याच मतदारसंघात असंघटित कामगार, घरेलू कामगार यांचीही मोठी संख्या आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील सर्वच नागरिक प्रामाणिकपणे कर भरत आहेत. परंतु मतदारसंघात त्यांचा योग्य प्रतिनिधी नसल्यामुळे त्यांची आर्थिक लूट होत आहे. शहरात इतरही प्रश्न ‘आ वासून’ उभे आहेत. वाहतूक कोंडींचा प्रश्न तर पिंपरी चिंचवडकरांच्या पाचवीला पुजला आहे.

कोण आहेत चेतन बेंद्रे ?
‘आम आदमी पार्टी’ चे महाराष्ट्र राज्याचे पदवीधर आघाडीचे अध्यक्ष चेतन बेंद्रे आहेत. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि लॉ चा विद्यार्थी असलेल्या चेतन बेंद्रे यांनी पक्ष स्थापनेपासून पक्षाचं काम सुरू केलं आहे. मागील आठ वर्षांपासून शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आंदोलने, मोर्चे काढून मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

प्रतिक्रिया :
राज्यात आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. यात आता आम आदमी पार्टी विधानसभा निवडणूक आघाडीत लढणार की स्वतंत्र लढणार हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. परंतु वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
– चेतन बेंद्रे, आप.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button