मिशन-२०२४: हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी सत्यजित देशमुख
शिराळा विधानसभा निवडणूक प्रभारीपदी सम्राट महाडिक : आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची मोर्चेबांधणी
![Mission-2024: Satyajit Deshmukh as Chief Election Officer of Hatkanangle Lok Sabha Constituency](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Satyjeet-Deshmukh-Samrat-mahadik-780x470.jpg)
सांगली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुखांची नियुक्ती जाहीर केली. जिल्हा परिषदेचे सदस्य सत्यजित देशमुख यांची हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुखपदी, तर शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुखपदी सम्राट महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रमुख शिलेदारांवर जबाबदारी, प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी असेल.
सध्या भाजपाची संपूर्ण देशभर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या स्तरावर मतदारसंघनीय मिशन भाजपची रणनीती ठरली आहे, संपूर्ण लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत, आणि हेच भाजपचं मिशन आहे.
तसेच, महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.