‘कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची’, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वादग्रस्त विधान

Radhakrishna Vikhe Patil | यंदाच्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात वाहून गेल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप बाकी आहे. अशातच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद पेटला आहे.
विखे पाटील काय म्हणाले?
सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. अनेक वर्ष काम चालू आहे, याच चिंता करायचं काम नाही. महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. ते करणारच आहोत. परंतु, तिथंपर्यंत आपलं काम थांबता कामा नये. उद्याच्या तरुणाच्या भविष्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, उद्योग उभारावे लागणार आहे, असं म्हणत विखेंनी सारवासारव केली.
हेही वाचा : रुपाली ठोंबरेंना धक्का, चाकणकरांवर टीका करणं पडणार महागात? पक्षाकडून नोटीस, ७ दिवसांच्या आत…
तसंच, कोविडच्या काळामध्ये दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते? असा सवाल करत माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणतं लोकांना वाऱ्यावर सोडत घरात बसले होते आणि आता मराठवाड्यात फिरत आहेत शेतकऱ्यांना दिलासा द्यायला, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.





