रुपाली ठोंबरेंना धक्का, चाकणकरांवर टीका करणं पडणार महागात? पक्षाकडून नोटीस, ७ दिवसांच्या आत…

Ruapali Chakankar Mahila Ayog : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील रूपाली ठोंबरे पाटील आणि रूपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत. तर रूपाली पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश प्रवक्ता पदाची जबाबदारी आहे. एकाच पक्षातील महिला नेत्यांमधील वाद टोकाला गेला आहे. अशातच रुपाली ठोंबरे यांना पक्षाची शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत प्रसारमाध्यमांत केलेलं वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे, पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी नोटिस बजावत ७ दिवसांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये चाकणकर यांनी तरुणीचं चारित्र्यहनन केलं असल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती. या दोन्हीही पक्षाच्या महिला नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल पक्षाने घेतली आहे. त्याबाबत रुपाली ठोंबरे यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. पक्षाचे संघटक सरचिटणीस संजय खोडके रूपाली ठोंबरे यांना ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे, म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा करण्यास सांगण्यात आलेले आहे.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘अचिव्हर्स डायलॉग्स पुणे एडिशन’ चे आयोजन
खुलासा करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देखील देण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत खुलासा करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी असे देखील नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या नोटिशीची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आली आहे.
संघटक सरचिटणीस संजय खोडके यांनी रूपाली पाटील-ठोंबरे यांना ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे 7 दिवसांच्या आत करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असं नमूद करण्यात आले आहे. तसेच या नोटिशीची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आली आहे.
याबाबत रुपाली ठोंबरे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहून म्हटलं आहे की, आज पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आलेला आहे. खरं तर खुलासा देण्याची वेळ 7 दिवस अत्यंत कमी वेळ देण्यात आली आहे. मी वैयक्तिक हितसंबध ते हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवाशी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देण्यात येईल. ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले त्याच्या विषयी खरतर काय खुलासा द्यावा? असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
इतकंच नाही तर पुण्यामध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा रूपाली पाटील सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामध्ये आंदोलन करणाऱ्या महिलांच्या हातातील पोस्टर चांगलेच चर्चेत आले होते.





